पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई: कांजूरमार्गच्या जागेवर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दावा ठोकला. त्याबाबत आज सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाने कांजूररमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम त्वरीत थांबवले जावे असे आदेश एमएमआरडीएला दिले आहेत. यामुळे मेट्रो कारशेडचे काम आता रखडणार आहे. यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.
सध्या कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे दिले असून फेब्रुुवारी महिन्यात या विषयावर अंतिम सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाचे आदेश जाहीर झाल्या नंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर वरून आपले मत मांडले आहे. मेट्रो मार्गासाठी ती जमीन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही कोर्टाच्या लिखित आदेशाची वाट बघत आहोत. मेट्रो ३ सोबतच ६,४ व १४ साठी ही जमीन आवश्यक आहे त्यामुळे सरकारचे पाच हजार पाचशे कोटी वाचत आहेत. व १ कोटी लोकांना याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी या ट्विटद्वारे सांगितले आहे.