■येणाऱ्या २ वर्षात टोलनाक्यापासून मुक्तता होईल; नितीन गडकरी यांच वक्तव्य
पालघर दर्पण: प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात मोठे वक्तव्य केले आहे. कार्यक्रमात गडकरी यांनी टोलसाठी जीपीएस प्रणालीचे काम सुरू असून येणाऱ्या २ वर्षात भारतातील महामार्गावर असलेल्या टोलनाक्यांपासून मुक्तता होईल असे सांगितले.
जीपीएस प्रणाली आणणार असल्यामुळे येत्या २ वर्षात वाहनांचा टोल लिंक केलेल्या बँक खात्यातून कमी केला जाईल असे देखील गडकरी यांनी सांगितले. तसेच सर्व नवीन वाहने या प्रणालीशी जोडले जातील. तर जुन्या जीपीएस सिस्टम तंत्रज्ञान बसविण्यासाठी सरकार जलदरीत्याने काम करेल. त्याचबरोबर जीपीएस प्रणालीमुळे वाहनांनी किती अंतर पार केल याच मोजमापन करून त्या वाहनांच्या टोलची किंमत लिंक असलेल्या बँक खात्यामधून कमी केली जाईल.