पालघर दर्पण: प्रतिनिधी
सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून ही माहिती त्यांनी स्वतः फेसबुक पोस्ट द्वारे कळविली आहे. दामले यांना ७ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवणार असल्याने त्यांचे काम सध्या थांबले आहे.
प्रशांत दामले हे उत्कृष्ठ अभिनेता बरोबरच ते उत्तम नाट्य निर्माते देखील आहेत. त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम केले असून लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. दामले यांच वय ६१ वर्ष असून सध्या ते एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगात व्यस्थ होते. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच प्रशांत दामले नाटकाच्या प्रयोगासाठी पुण्याला गेले होते. त्या नंतर ते मुंबईत आले तेव्हा त्यांना कारोनाचे सिमटमन्स जाणवू लागले. यादरम्यान करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आता मुंबईत होणार नाटकाचे पुढील प्रयोग रद्द करण्यात आले आहे.