■ कुंदन संखे यांच्या रुग्णवाहिकेचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: करोना काळात केलेल्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यानंतर जिह्यातील शिवसेना नेते कुंदन संखे यांनी आणखीन एक पाऊल उचलले आहे. संखे यांनी जिह्यातील जनतेच्या आरोग्यसेवेकरिता अद्ययावत रुग्णवाहिका घेतली असून त्याचे उदघाटन महाराष्ट्राचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हे उद्धाटन शुक्रवारी १८ डिसेंबर रोजी ठाण्यात करण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कुंदन संखे यांच्या माध्यमातून सातत्याने हजारो कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले गेलेे. मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात आली. मास्क, सैनिटाजिंग फवारणी, तीन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले. तसेच करोनावर मात करून कुंदन संखे यांनी प्लाज्मा दान देखील केले आहे.
मात्र आता अजून पुढचे पाऊल उचलत त्यांनी पालघर जिल्ह्यातील रुग्णांना अडचणीच्या प्रसंगात तात्काळ सहकार्य व्हावे या हेतूने एक अद्ययावत रुग्णवाहिका घेतली आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी कुंदन संखे यांचे कार्य हे राजकारणाच्या पलीकडचे असून सदर रुग्णवाहिकेमुळे पालघर जिह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळेल असे म्हणत निर्धार सेवा संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. सदर रुग्णवाहिकेच्या उद्घाटना प्रसंगी खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण उपस्थित होते.