■ विविध ११ भाषांमधून पंतप्रधानांनी केले देशवासियांना आव्हाहन.
पालघर दर्पण: प्रतिनिधी
दिल्लीच्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आजचा २३ वा दिवस असून अद्यापही तोडगा न निघाल्यामुळे शेतकरी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र सरकार कृषी कायदे रद्द करण्यास तयार नसून हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत असे सांगत आहे. मात्र कृषी कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. यातच आता पंतप्रधान मोदी यांनी आंदोलना संबंधीत ट्विटर वर ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी विविध ११ भाषांमधून ट्विट केले.
दिल्लीतील आंदोलनाला संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत असल्याने मोदी सरकारची यावर पुढची भूमिका काय असणार अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. यातच आता सरकारची बाजू मांडली आहे. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना पत्र लिहिले. या पत्रात कृषी कायद्यातील सुधारणांबाबत काही शेतकरी संघटनांनी एक भ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचा भ्रम, व चिंता दूर करणे माझे कर्तव्य आहे. असे लिहिले असून सत्य व योग्य वस्तुस्थिती समोर ठेवणे माझी जबाबदारी आहे असे देखील या पत्रात लिहिले. यावर पंतप्रधानी देखील ट्विटर मार्फत शेतकऱ्यांना व नागरिकांना हे पत्र वाचण्याचे आव्हाहन केले आहे.
■ पंतप्रधांनी केलेलं ट्विट
मोदी म्हणाले, “कृषी मंत्र्यांनी शेतकरी बंधू-भगिनींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचा हा विनम्र संवादाचा प्रयत्न आहे. सर्व अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र जरूर वाचावे. देशवासियांनाही माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे.”