■ मुर्त्या आढळलेल्या ठिकाणीे खोदकाम करून पाहणी करावी अशी ग्रामस्थांची सरकारकडे मागणी
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात पुरातन कालीन शिल्पकला असलेल्या मुर्त्या आढळल्या आहेत. या पुरातन कालीन मुर्त्या ग्रामस्थ खोदकाम करत असताना आढळून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे गावाच्या हिताच्या दृष्टीने ग्रामस्थांनी विचार केला असून मुर्त्या सापडलेल्या ठिकाणी खोदकाम करावे असे सरकारकडे लेखीे पत्राद्वारे मागणी केली आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेल्या ग्रामदान मंडळ जामसर या गावातील तळ्यात पुरातन कालीन शिल्पकला असलेल्या मुर्त्या आढळून आल्या आहेत. यामुळे सध्या या गावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जात आहे. आढळलेल्या मुर्त्यामध्ये ५ तोंडांची गाय व खालच्या बाजूला वासरू, लढाईत मरण पावलेल्या वीरांचे प्राचीन स्मारक, व अशा अजून काही वस्तू आहेत. यातील वस्तू १२ व्या शतकातील मध्ययुगीन काळातील आहेत असे ग्रामस्थांनाकडून सांगण्यात येत असून यामुळे इतिहासाची पाने उघडतील अशी गावात चर्चा आहे.
आशा आणखीन पुरातन मुर्त्या मिळू शकतील असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. गावाच्या हिताच्या दृष्टीने विचार करत ग्रामस्थांनी सरकारकडे पुरातन मुर्त्या आढळलेल्या ठिकाणी खोदकाम करावे अशी लेखी मागणी केली आहे. मध्ययुगातील पुरातन तसेच शिल्पकला असलेल्या मुर्त्या व जुन्या काळातील मंदिरांची रचना नागरिकांना पाहायला मिळेल त्यामुळे ग्रामदान मंडळ जामसर गावाला पर्यटनाचा दर्जा मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.