◾धक्का सहन न झाल्याने मोठ्या भावाचा हार्ट अटकने मृत्यू; आत्महत्या करण्या अगोदर लिहिले बच्चु कडू यांना पत्र
पालघर दर्पण: प्रतिनिधी
अमरावती मधील एका शेकऱ्याने आत्महत्या केली असून राज्यमंत्री बच्चु कडू यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्र लिहलं आहे. लहान भावाने आत्महत्या केल्याचे दुःख मोठ्या भावाला सहन न झाल्याने हार्ट अटॅक आला व त्यातच मोठ्या भावाचा देखील मृत्यू झाला. एकाच वेळी कुटुंबातील दोन्ही कुटुंबप्रमुख गमावल्याने भुयार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
अमरावती मधील धनेगाव येथील शेतकरी अशोक भुयारी यांनी विष पिऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले. अशोक भुयार हे संत्र्यांचे उत्पादन घेत होते. व्यापारी शेख आमीन व शेख गफूर यांनी संत्री विकत घेऊन पैसे न दिल्याने ही आत्महत्या केली आहे. असे अशोक भुयार यांनी आत्महत्या करण्या अगोदर राज्यमंत्री बच्चु कडू यांना लिहिले पत्रात सांगितले होते.त्या पत्रात न्याय मिळवून द्यावा अशी केविलनाणी विनवणी केली आहे. त्याच बरोबर तेथील पोलिसा उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी मदत न केल्यामुळे देखील आत्महत्या केली असल्याचे पत्रात लिहिले. या दरम्यान लहान भावाच्या आत्महत्येचा धक्का मोठा भाऊ संजय भुयार यांना सहन झाला नाही व हार्ट अटॅकमुळे त्यांचाही मृत्यू झाला.
हा सारा धक्कादायक प्रकार समोर येताच गावातील नागरिक संतप्त होऊन तालुक्यातील अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. दोषींवर कारवाई करण्याची मागणी पोलीस स्टेशनमध्ये केली. त्यावेळी पोलीस उपरिक्षक व दोन्ही व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र आता या साऱ्या प्रकाराकडे बच्चु कडू लक्ष घातली का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.