■ जगभरात अनेक देशात करोना पासून बचाव करणाऱ्या आपत्कालील लसीकरणाला मंजुरी; राहुल गांधी यांनी केले प्रश्न उपस्थित
पालघर दर्पण: प्रतिनिधी
जगातील चीन, यूएस, युके, रशिया या देशांमध्ये करोना पासून बचाव करणाऱ्या आपत्कालीन लसीला मंजुरी दिली आहे. मात्र भारतात अद्याप लस दिली जात नाही. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटर वरून ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
करोना महामारीचे सावट संपूर्ण देशभरात पसरले असून नागरिक आता हैराण झाले आहेत. देशातील प्रत्येक नागरिकांचे लक्ष करोना पासून बचाव करणाऱ्या लसीकडे लक्ष आहे. इतर देशामध्ये लस वापरण्यासाठी मंजुरी मिळाली असून भारतात अजून लस वापरण्यासाठी मंजुरी दिली नाही. यावरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटर वर ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
■ काय म्हणाले राहुल गांधी..
जगातील २३ लाख लोकांना कोव्हिड लस मिळाली आहे. चायना, यूएस, युके, रशिया या देशामध्ये कोव्हिड लस सुरू केली आहे. असे म्हणत भारताचा नंबर कधी येईल मोदी जी? असा प्रश्न राहुल गांधी यांनी मोदींना ट्विटर वरून केला आहे.