पालघर दर्पण: वार्ताहर
नालासोपारा: तुळींज पोलीस ठाण्यात हवालदाराने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी नाईट ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदार सखाराम भोये (४१) यांनी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षकाच्या दालनात जाऊन डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे .आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.