■ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल सेवा सुरू होणार असल्याची शक्यता मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली
पालघर दर्पण: प्रतिनिधी
मुंबई : जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल जानेवरीतील पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकल सुरू करण्या बाबत सकारात्मक विचार करीत आहे असे देखील त्यांनी सांगितले.
कोव्हिड-१९ या महामारीमुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊनचे आदेश सरकार ने दिले. त्यामुळे सर्वच सेवां बरोबरच रेल्वे सेवा देखील ठप्प झाली. मात्र परिस्थितीत थोडा सुधार जाणवल्यावर अनलॉक दरम्यान लोकल सेवा फक्त आवश्यक सेवा पुरवण्याऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच सुरू करण्यात आली. त्या नंतर महिलांसाठी देखील लोकल प्रवासाला मान्यता दिली. मात्र मधल्या मधे अडकलेल्या सर्व सामान्यांना प्रवास करणे अद्यापही कठीणच आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी लोकल सेवा कधी सुरू करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून होते. त्यातच वडेट्टीवार यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल सेवा सुरू केल्या जातील अशी शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री त्यावर सकारात्मक विचार करत आहेत असे सांगितले. वडेट्टीवार यानी देण्यात आलेली माहित समोर येताच नागरिकांनी समाधानाची भावना व्यक्त केली आहे.