पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: पडघे गावाचे माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर हरिश्चंद्र पाटील (वय ७४) यांचे २३ डिसेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि प्रशांत, निशांत व अभिजित ही मुले असा परिवार आहे.
मुंबई येथील खाजगी कंपनीत काम करून सेवानिवृत्ती नंतर प्रभाकर पाटील यांनी पडघे येथील मूळ गावी येऊन शेती बागायती केली. पडघे ग्रामपंचायतीत ते सदस्य होते आणि उपसरपंच पद त्यांनी भूषविले होते. पालघर येथे व्यायाम शाळेसह अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना त्यांनी आर्थिक योगदान दिले होते. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता.
प्रभाकर पाटील यांनी सूर्यवंशी ज्ञाती मंडळात सक्रिय राहून अनेक जबाबदार्या सांभाळल्या. वधूवर सूचक मंडळ, क्रीडा व इतर ज्ञातीच्या उपक्रमात ते सहभागी होत असत. प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांचे नावलौकिक होते. बागायतीमध्ये दुसर्या प्रदेशातील झाडे लावून त्यांनी यशस्वी प्रयोग केले होते.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत नामवंत वास्तुविशारद निशांत आणि विकासक अभिजित यांचे ते वडील होते.