■ मात्र शेतकरी संघटना कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम; कायदे रद्द झाल्या शिवाय आंदोलन मागे नाही
पालघर दर्पण: प्रतिनिधी
आज दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला जवळपास महिना झाला असून अनेक बैठका व दोन्ही कडून संवाद साधुन देखीलही कृषी कायदे रद्द करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. यातच शुक्रवारी (काल)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा शुभारंभ केला. या दरम्यान पंतप्रधान यांनी कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी चांगले व फायदेशीर असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. यावर शेतकरी संघटना प्रतिक्रिया दिली असून कृषी कायदे रद्द झाल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे सांगितले आहे.
काल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ झाला. हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने झाला असून यात ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये इतकी हक्क जमा केली. या कार्यक्रमात मोदी यांनी सांगितले की, कृषी कायद्या संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत भ्रम निर्माण केला जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी कोणी विकत घेऊ शकत नाही. पूर्वी पीक वाया जायचे आता ते विकले जाते. एका क्लिक वरून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. यात कोणतीही हेराफेरी नाही असे सांगितले.
मात्र शेतकरी संघटना कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असून कृषी कायदे रद्द झाल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे सांगितले आहे. त्याच बरोबर कायदे तयार करत असताना शेतकऱ्यांशी चर्चा झाली नाही. मात्र आता कायदे हिताचे कसे हे पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. व कायद्यांमध्ये बदल करू पण कायदे रद्द केले जाणार नाही असे सुद्धा केंद्र सरकार कडून सांगितले जात आहे. त्यामुळे कायदे रद्द होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही या भुमिकेवर शेकातरी ठाम आहेत.