पालघर दर्पण, प्रतिनिधी
कृषी कायदे रद्द करावे यासाठी शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असून अद्याप तोडगा निघालेला नाही. आंदोलनाचा आजचा ३५ वा दिवस असून आज शेतकरी संघटना व सरकारची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.
केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्यासाठी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना चर्चेसाठी येण्याचा प्रस्ताव पाठवला. ही चर्चा आज दुपारी २ वाजता होणार असून याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. आता पार्यंत शेतकरी संघटना व केंद्र सरकारच्या ६ बैठकी झाल्या आहेत. आजची ७ वी बैठक असून या बैठकी नंतर तरी तोडगा निघेल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मात्र शेतकरी संघटना केंद्र सरकार सोबत चर्चा करण्यास तयार असले तरी देखील त्यांनी ४ अटी ठेवलेल्या आहेत. तीनही नवीन कृषी कायदे रद्द करावे अशी पहिली अट असून दुसरी अट एमएसपीची कायदेशीर हमी आहे. तिसरी वीज बिलच्या मसुद्यात बदल करा व चौथी पराली कायद्यातून शेतकऱ्यांना वगळावे. अशी आहे.