◾ ज्वेलर्स च्या वरच्या बाजूच्या कार्यालय भिंत तोडून केली कोट्यवधी रूपयाच्या सोन्याची चोरी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: चित्रालय भागातील नामांकित ज्वेलर्स मध्ये बुधवारी पहाटे टाकलेल्या दरोडा मध्ये कोट्यवधी रुपयांचा माल लंपास करण्यात आला आहे. ज्वेलर्स दुकानाच्या वरच्या बाजूला असलेल्या एका कार्यालयाच्या भिंतीला होर पाडून चोरट्यांनी ज्वेलर्स मध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे ही चोरी मार्गी लावण्यासाठी सोसायटी मध्ये ठेवण्यात आलेल्या नवीन सुरक्षारक्षकाच्या सहाय्याने दरोडा टाकला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बोईसर शहरातील चित्रालय येथील मंगलम ज्वेलर्स मध्ये बुधवारी 30 डिसेंबर रोजी पहाटे तिन वाजताच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. ज्वेलर्स दुकानाच्या इमारती मध्ये वरच्या बाजूला असलेल्या सिस्टम फाँर सक्सेस या आँफिस मधुन ज्वेलर्सच्या भिंतीला होर पाडून चोरट्यांनी मध्ये प्रवेश केला. साधारण पणे पहाटे 2:9 वाजताच्या सुमारास पासून चोरीच्या हालचाली सुरू झाल्याचे येथील इमारती मधील सिसीटिव्ही चित्रीकरणात मध्ये दिसून येते. चोरट्यांनी ज्वेलर्स मधील साधारण 14 किलो सोने व सुमारे 60 लाख रूपये रोकड अशी कोट्यवधी रुपयांची चोरी केली आहे. चोरट्यांनी तिजोरी गँस कटर ने कापून ही चोरी केली असून यासाठी वापरण्यात आलेला सिलेंडर या इमारती मध्ये राहत असलेल्या वाँचमन च्या रूममध्ये सापडले असल्याने ही चोरी करण्यासाठी वाँचमन साथीदार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलीस करत असून अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दरोड्यांच्या ठिकाणी भेट दिली आहे.