पालघर दर्पण, बोईसर
भीमनगर मधील दया नगर परिसरात समर्थ चौक येथे दत्त जयंती साजरी करण्यात आली. दर वर्षी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाणारी दत्त जयंती यंदा साध्या पद्धतीने साजरी केली गेली.
दत्त मंदिरामध्ये केलेली फुलांची सजावट, गाभाऱ्यात दरवळणारा धुप- अगरबत्तीचा सुगंध, होमहवन तसेच किर्तनामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मंडळ (बोईसर) तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही दत्तजयंती साजरी करण्यात आली. दर वर्षी सोहळ्या प्रमाणे दत्तजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. जवळपास पाच हजारांच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात मात्र यंदा फारशी गर्दी दिसली नाही. त्याच बरोबर दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते व संध्याकाळी दत्तांची पालकी मिरवणूक काढण्यात येते मात्र यंदा महाप्रसादाचे आयोजन केले नसून दत्तांची पालकी मिरवणूक काढली नाही. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत सगळ्यांनी मास्क व सॅनिटायझर चा वापर केला.
यंदाची दत्त जयंती करोनाच्या प्रदूर्भावामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मंडळ (बोईसर) बरोबरच महिला मंडळ व महिला बचत गटांनी देखील विशेष परिश्रम घेतले.