■ ३० डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत देखील तोगडा निघाला नाही.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्यापही कृषी कायदे रद्द न झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आज आंदोलनाचा ३७ व दिवस असून आता पुन्हा एकदा ४ जानेवारी रोजी केंद्र सरकार व शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
केंद्र सरकार व शेतकरी संघटनांची ३० डिसेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती. मात्र त्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे आता ४ जानेवारी रोजी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले आहे. मात्र अनेक बैठक घेऊन देखील तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटना संतप्त आहेत. व या बैठकीत तोडगा निघाला नाही तर शेतकरी आंदोलन तीव्र करण्यात येतील असे सांगितले आहे. ३० डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी संघटनांना कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीला पर्याय देण्याबाबत सांगितले. सरकारकडून एमएसपी आणि तीन कृषी कायद्यांवर कमिटी स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.