पालघर दर्पण, प्रतिनिधी
२६-११ च्या मुंबई हल्ल्यानंतर दहशदवादी संघटना लष्कर-ए- तोयबाचा ऑपरेशन कमांडर लखवी या जागतिक दहशदवादीला पाकिस्तानात अटक झाली आहे.
२६-११ च्या मुंबईतील हल्ल्यात दहशदवादी जकीउर रहमान लखवी चा मोठा हाथ होता. त्याने मुंबई झालेल्या हल्याचा संपूर्ण आराखडा आखून दिला होता असे त्या वेळी समोर आले होते. या हल्ल्यात जवळपास १६६ लोकांनी प्राण गमावले होते. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. ६ वर्षा नंतर पाकिस्तानच्या तुरूंगातून सुटका करण्यात आली. मात्र पुन्हा एकदा दहशदवाद्यांना मदत व फंडिंग करण्याबाबत पाकिस्तानात लखवी वर कारवाई करण्यात आली आहे.