■ पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्या देशवासियांना शुभेच्छा.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
कोव्हीड-१९ ही महामारी संपूर्ण देशभरात व्यापली असून त्याची लागण बहुतांश जणांना झालेली आहे. यामुळे नागरिक या महामारीमुळे त्रासलेले असून आता प्रत्येक नागरिक कोव्हीड-१९ पासून बचाव करणारी लसीच्या प्रतीक्षेत आहेे. याम्यान नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली असून सिरम ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशील्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे.
हा निर्णय लसीकरण मोहिमेतील एक महत्वाचा टप्पा असून कोव्हॅक्सीन व कोव्हिडशील्ड या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं डीसीजीआयने म्हटलं आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाणार अशी माहिती समोर येत आहे. कोव्हीड लसीला आपात्कालीन संमती दिल्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर वर ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या कोरोना काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि सर्व कोरोना योध्यांचे मी आभार व्यक्त करतो. या योध्यांनी अनेकांचे जीव वाचविल्याबद्दल त्यांचे कृतज्ञ आहेत. त्याचबरोबर त्यांनी अभिनंदन भारत असे लिहून लसीसाठी परिश्रम घेणारे शास्त्रज्ञ व लसीची निर्मिती कराणाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.