पालघर दर्पण, प्रतिनिधी
ईडीकडून शिवसेनेच्या नेत्यांना वारंवार नोटीसा येत असल्या कारणाने आता शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. तसेच ईडी विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करणारे ट्विट केले आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागोमाग खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यांना ५ जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलवले आहे. त्यामुळे ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार व मुंबई तसेच मुंबई शेजारील परिसरातील शिवसैनिक यासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहेत. या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी ट्विटर वरून शिवसेनेला टीका केली.
शिवसेना ईडी ऑफिस बाहेर मोर्चा काढणार म्हणे. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी निघाला नाही. शेतकऱ्यांसाठी निघाला नाही. व राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही. मात्र वैयक्तिक घरातील उणी धुणी बाहेर निघत आहेत म्हणून मोर्चा. भाजप नेते नितेश राणे यांनी असे ट्विट करत महाराष्ट्र धर्म? असा सवाल केला आहे.