■ पुन्हा ८ जानेवारी रोजी बैठक; तर शेतकरी संघटना मात्र आपल्या मागण्यांवर ठाम.
पालघर दर्पण: प्रतिनिधी
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्यापही कृषी कायदे रद्द न झाल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा दिला आहे. आज आंदोलनाचा ३९ वा दिवस असून आज ४ जानेवारी रोजी केंद्र सरकार व शेतकरी संघटनांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत देखील तोगडा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली आहे. मात्र शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर अद्यापही ठाम आहेत.
शेतकरी संघटना मागण्या मान्य केल्या शिवाय घरी परत जाणार नाही असे शेतकरी नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. आजच्या बैठकीत शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कृषी कायदे रद्द करणार की नाही असा थेट प्रश्न केला होता. मात्र यावर सरकार कायद्यांमध्ये बदल करायला तयार आहे असे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले. त्या नंतर याच मुद्द्यावर बराचवेळ गेल्याने आजची बैठक देखील निष्फळ ठरली. व कोणताही तोडगा निघाला नाही. आजची ही सातवी बैठक होती. व पुढे ८ जानेवारी रोजी पुन्हा सरकार व शेतकरी संघटनांमध्ये आठव्यांदा बैठक घेतली जाणार आहे.
केंद्र सरकार व शेतकरी संघटनांची ३० डिसेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती. मात्र त्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे आता ४ जानेवारी रोजी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होतेे. मात्र या बैठकीत देखील तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटना संतप्त आहेत. व जो पर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत घरी परत जाणार नाही. असे त्यांनी सांगितले आहे.