■नेत्यांनी केला आंदोलक शेतकऱ्यां विरोधात गुन्हा दाखल; दाखल केलेलं गुन्हे मागे घ्या अस शेतकरी संघटनेचा इशारा
पालघर दर्पण: प्रतिनिधी
केंद्र सरकार व शेतकरी संघटना यांची काल ४ जानेवारी रोजी बैठक झाली. त्या बैठकीत तोडगा निघाला नसून कृषी कायदे रद्द करण्यात आलेलले नाही. मात्र शेतकरी संघटना देखील आपल्या भूमिकेवर ठाम असून मागण्या मान्य होई पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे त्यांचे मत आहे. कालच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता आक्रमक मार्गाच्या दिशेने जाण्याचे ठरवले असल्याचे दिसून येत आहे. संताप व्यक्त करत शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या काही लोकांनी भाजप नेत्यांच्या घरासमोर ट्रॉलीभर शेण ओतून ठेवले आहे.
आज शेतकरी आंदोलनाचा ४० वा दिवस आहे. मात्र अद्याप कोणताही यावर तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातं आहे. जोपर्यंत यावर तोडगा काढत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे शेतकरी नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याच हरियाणा मध्ये राहणारे पंजाब सरकारमधील माजी मंत्री तीक्ष्ण सूद यांच्या घराच्या मुख्य द्वारासमोर केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत ट्रॉली भरून शेण ओतण्यात आले. घरासमोर शेण ओतणारे लोक ही आंदोलन करणारे शेतकरी असल्याचे सांगितले जात आहे. त्यावर माजी मंत्री तीक्ष्ण सूद यांनी या प्रकरणा बाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर होशियारपूर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केला असल्याचा गुन्हा शेतकरी आंदोलकांवर दाखल केलं आहे.
सिंधू येथे आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना सूद यांनी वादग्रस्त आंदोलन केले होते. कृषी कायद्या विषयी आंदोलकांना कोणतीच माहिती नसून काही आंदोलक फक्त पिकनिक म्हणून आंदोलनासाठी जात असल्याचं व्यक्तव्य सूद यांनी केलं होतं. त्यामुळे त्याचा संताप व्यक्त करत शेतकरी आंदोलकांनी सूद यांच्या घरा समोर शेण ओतल असे समोर आले. यातच शेकऱ्यांवर गुन्हा दाखल केल्या बाबाबत भारतीय किसान युनियन राजवळचे नेत्यांनी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे असे सांगितले आहे. गुन्हे मागे घेतले नाही तर जालंदरमधील रस्त्यावर उतरू व घरा समोर शेण ओतण्याचा प्रकार पुन्हा ठिकठिकाणी घडेल असा इशारा दिला आहे.