पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यात करोना लसीकरणासाठी रंगीत तालीम घेण्यात आली. तालुक्यातील मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मासवण आश्रम शाळा येथे करोना लसीकरणासाठी रंगीत तालीम म्हणजेच ड्राय रन आज प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे व नियमांचे पालन करत पार पडली.
रंगीत तालीम म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आरोग्य व ग्रामीण रुग्णालयांच्या ११,९१३ खासगी व ग्रामीण भागातील ५४९८ आरोग्य कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. व दुसऱ्या टप्प्यात पोलीस, ५० वर्षावरील सर्व नागरिक तसेच ५० वर्षाखालील रक्तदाब, मध्यमेह, कर्करोग अशा रुग्णांना लस देण्यात येईल. सध्या जिल्ह्यातील १६,००० कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी ही तालीम घेण्यात आली.पालघरामध्ये करोनालसीसाठी रंगीत तालीम
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यात करोना लसीकरणासाठी रंगीत तालीम घेण्यात आली. तालुक्यातील मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मासवण आश्रम शाळा येथे करोना लसीकरणासाठी रंगीत तालीम म्हणजेच ड्राय रन आज प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे व नियमांचे पालन करत पार पडली.
रंगीत तालीम म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आरोग्य व ग्रामीण रुग्णालयांच्या ११,९१३ खासगी व ग्रामीण भागातील ५४९८ आरोग्य कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. व दुसऱ्या टप्प्यात पोलीस, ५० वर्षावरील सर्व नागरिक तसेच ५० वर्षाखालील रक्तदाब, मध्यमेह, कर्करोग अशा रुग्णांना लस देण्यात येईल. सध्या जिल्ह्यातील १६,००० कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी ही तालीम घेण्यात आली.