◾अतिशय प्रदूषणकारी उद्योजक समुहाचा कारखान्यांवर अखेर कारवाई; याच उद्योजकांच्या इतर प्रदूषणावर कारवाई बाबत दिरंगाई
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सर्वात प्रदूषणकारी असलेल्या एका उद्योजकांचा प्रदूषणकारी कारखाना बंद करण्याचे उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणात नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आल्याने कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
तारापूर औद्यागिक क्षेत्रातील प्रदूषकारी आरती ड्रग्ज लि. प्लाट नं. ई- 21, या कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंदची कारवाई केली आहे. या कारखानदारांच्या वाढत्या प्रदूषणाबाबत व या उद्योग समूहाच्या विविध कंपन्यांमधून निघणाऱ्या रसायनिक सांडपाणी व घातक घन कचर्याची विल्हेवाट राज्याच्या विविध भागात नैसर्गिक स्रोतांमधे मागील अनेक वर्षांपासून लावली जात असल्याबाबत अनेकदा उघडकीस आले होते. यातच मागील महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्या सर्व्हेक्षण दरम्यान आरती ड्रग्ज लि. प्लाट नं. ई -21, या कंपनीत पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले होते.
आरती ड्रग्ज कारखान्यात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या डायथिल सल्फॉक्साईड (डीएमएसओ) च्या निर्मिती प्रक्रीये दरम्यान निघणारे रसायन आणि त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जात आहे याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली नसल्याचे कारखाना बंद करण्याचे देण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. आरती ड्रग्स या उद्योजक समुहाला तारापूर मधील सर्वात जास्त प्रदूषणकारी ठरवत कोट्यवधी रुपयांचा दंड राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावला आहे. असे असले तरी या कारखान्या कडून प्रदूषण सुरूच ठेवले असून या उद्योजकांच्या इतर प्रदूषणकारी कारखान्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी नागरीकांन कडून केली जात आहे.
◾कारखान्यातील त्रुटी
1) या कंपनीतून उत्पादन प्रक्रिये दरम्यान निघणाऱ्या उच्च सीओडी / उच्च टीडीएस सांडपाणी वाहतुक करणाऱ्या टँकरवर जीपीआरएस प्रणालीची नोंद नाही. हे रासायनिक सोडपाणी प्रक्रियेसाठी सहयोगी कंपनी टी -150 एमआयडीसी तारापूर, येथे पाठविल्याची नोंद नाही.
2) लाइन मॉनिटरिंग सिस्टम प्रदान केलेले नाही
3) या कंपनीतील उत्पादन प्रक्रियेतून निघणारा घातक घन कचरा मे. (एमडब्ल्यूएमएल) तळोजा या ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी पाठविल्याबाबतची एप्रिल -2020 ते ऑक्टोबर 2020, पर्यंतची कोणताही माहिती उपल्बध नाही. 5)
4) ईटीपी आउटलेटमधून संकलित केलेली जेव्हीएस पॅरामीटर सीओडी – १२५६० मिलीग्राम/एल, टीडीएस-४८५२ मिलीग्राम/एल म्हणजे जो संमती मर्यादेपेक्षा जास्त आढळून आला आहे.
5) या कंपनीत उच्च सीओडी / उच्च टीडीएस प्रवाह वेगळा करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पारंपारिक प्रवाही उपचार केंद्र (ईटीपी) ची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध नाही.
◾ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध सर्व अहवाल आणि नोंदी तपासल्यानंतर या कंपनीने जाणूनबुजून आणि हेतुपुरस्सर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (संमत्तीपत्र) परवान्यातील व provisions of Water (P & CP) Act, 1974 and Air (P & CP) Act, 1981. नियम व तरतुदीं मधील अटींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालय मुंबई यांच्याकडील आदेशानुसार प्रादेशिक अधिकारी ठाणे यांनी 4 जानेवारी रोजी या कंपनीचे उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 72 तासा नंतर कारखान्यांचे उत्पादन बंद करण्यात आले आहे.