◾महसूल विभागाकडून एक सक्शन पंप जप्त, गॅस कटरच्या सहाय्याने नष्ट केला
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: वैतरणा खाडी पात्रातील अनधिकृत रेती उत्खननावर मंगळवारी (ता.12) महसूल विभागाकडून कारवाईत करण्यात आली आहे. बहाडोली गावच्या हद्दीतील वैतरणा खाडी पात्रातून रेती उत्खनन करणारा एक सक्शन पंप जप्त करण्यात आला आहे. गॅस कटरच्या सहाय्याने सक्शन पंप नष्ट करण्यात आला. महसूल विभागाच्या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
अनधिकृत रेती उपशावर कारवाईसाठी मनोरचे मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे यांचे पथक बोटीच्या सहाय्याने वैतरणा खाडी पात्रात गस्त घालत होते. गस्ती दरम्यान त्यांना बहाडोली गावच्या हद्दीत एक लोखंडी बोट आणि सक्शन पंपाच्या सहाय्याने रेती उपसा करीत असल्याचे आढळून आले.रेती उपसा करणाऱ्या सक्शन पंप आणि बोटीवर कारवाईसाठी जात असताना रेती माफियांनी सक्शन पंप खाडी पात्रात सोडून लोखंडी बोट सुरू करून साखरे गावच्या दिशेने पळ काढला.सक्शन पंप जप्त करून बोटीला बांधून दहिसर तर्फे मनोर रेती बंदरात आणून क्रेनच्या साहाय्याने सक्शन पंप नदीपात्रातून बाहेर खेचून काढली.त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने सक्शन पंप कापून नष्ट करण्यात आला.महसूल विभागाने अनधिकृत रेती उपश्यावर सुरू केलेल्या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
कारवाई पथकात सफाळे मंडळ अधिकारी वसंत बारवे, तलाठी नितीन सुर्वे आणि महेश कचरे यांचा सहभाग होता.