■ जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम; पहिल्याच दिवशी प्रत्येक सेंटरवर१०० लाभार्थ्यांना दिली जाणार लस
पालघर दर्पण: प्रतिनिधी
करोना या महामारीमुळे संपूर्ण जग त्रासलेले असून करोना पासून बचाव करणाऱ्या लसीच्या प्रतीक्षेत आहेत. लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. उद्या शनिवारी १६ जानेवारी पासुन लसीकरण सुरू होणार आहे.
देशात तयार होणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड व भारत बायोटेकची कोवँक्सिन या लसींना मंजुरी दिली आहे. शनिवारी १६ जानेवरी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक सेंटरवर १०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. सर्वप्रथम आरोग्य क्षेत्रातील जवळपास ३ कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रावर लस दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यातील करोना योधांच्या लसीकरणासाठीचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.