■ जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ.
पालघर दर्पण: प्रतिनिधी
करोना या महामारीमुळे संपूर्ण जग त्रासलेले असून करोना पासून बचाव करणाऱ्या लसीच्या प्रतीक्षेत आहेत. लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज देशव्यापी करोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. व या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
देशात तयार होणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड व भारत बायोटेकची कोवँक्सिन या लसींना मंजुरी दिली असून आज १६ जानेवरी रोजी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांना लस दिली जाईल. व येत्या टप्प्यात ही संख्या ३० कोटींवर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्याच बरोबर लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहेत. दोन्ही डोस घेतल्या नंतर दोन आठवड्यानंतर शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये आवश्यक बदल होतील असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी लसीकरणास शुभारंभ केल्या नंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात सर्वप्रथम एका आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही कोरोनाची लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील करोना योधांच्या लसीकरणासाठीचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. अशी महिती देखील समोर येत आहे.