पालघर दर्पण : प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यात कोव्हिड लसीकरणास जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. यावेळी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सागर पाटील यांना पहिली लस टोचून लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पालघरच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.