पालघर दर्पण : प्रतिनिधी
कृषि कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. सरकार सोबत अनेक बैठकी होऊन देखील अद्याप तोडगा निघाला नाही. त्यातच आता २६ जानेवारी 2 दिवसांवर आली असून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर परेड करणार असल्याचे सांगितले होते. यावर केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांन मार्फत दाखल केली होती. मात्र आता शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी देखील आंदोल सुरूच राहील असे जवळपास आठवड्या भरापूर्वी शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आलं. दिल्लीतील रिंग रोडच्या बाह्य भागात ट्रॅक्टर परेड करण्यात येईल व हे परडे अतिशय शांततेत पार पाडण्यात येईल. असे सिंधु बॉर्डर वर आंदोलनास्थळी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत संघटना प्रमुख योगेंद्र यादव यांनी सांगितले होते. यादरम्यान शेतकऱ्यांना मोर्चा काढण्यास किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्यास मनाई करावी अशी याचिका केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांमार्फत दाखल केली होती. शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्यामुळे पोलिसांनी याबाबत निर्णय घ्यावा अस सुप्रीम कोर्टाने सांगितले होते.
यावर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परेडसाठी परवानगी दिली आहे. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाजीपुर बॉर्डर व शहाजापूर बॉर्डर येथून ट्रॅक्टर्स दिल्लीमध्ये येणार आहेत. शेतकऱ्यांना आउटर रिंग रोडवर एकत्रित मोर्चा करायचा होता. मात्र त्याऐवजी दिल्लीतल्या अंतर्गत रस्त्यांवर मर्यादित प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे. सर्व सीमांवरचे ट्रॅक्टर एकत्रित येणार नाहीत तर जिथपर्यंत परवानगी दिली आहे तिथून ते आपापल्या ठिकाणी परत माघारी जाणार आहेत.