पालघर दर्पण : प्रतिनिधी
पती आपल्या पत्नीचा बँक खात्याचे तपशील आणि प्राप्तिकरण विवरणपत्राची मागणी करू शकत नाही. अशी माहिती केंद्रीय माहिती आयोगाने दिली आहे.
आरटीआय कायद्यानुसार आता पत्नीच्या बँक खात्याचे तपशील व खात्यातील पैसे तसेच विवरणपत्र मागण्याचा अधिकार पतिला नाही असा निकाल माहिती आयुक्त नीरज कुमार गुप्ता यांनी दिला आहे. एका अर्जदाराने माहिती अधिकार कायद्यांतर्गत आपल्या पत्नीची खाती असलेल्या बँकांची नावे आणि त्यांच्या शाखांचे पत्ते देण्याची मागणी केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यावर अर्जदाराने माहिती आयोगाकडे माहितीचा अधिकार कायदा कलम११ नुसार दाद मागितली.
यावर सुनावणी झाली असून एखाद्याची वैयक्तिक माहिती उघड करण्याचा जर केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांचा विचार असेल तरच माहिती अधिकार कायद्याचे कलम ११ होते. म्हणून कलम ८(१) नुसार माहिती अधिकाऱ्याने माहिती नाकारली तर कलम ११ लागू होत नाही. अस देखील दावा आयोगापुढे करण्यात आला.