◾प्रदूषणकारी कारखान्यांन कडून घातक रसायनाची विल्हेवाट; साळवी केमिकल कारखान्यांचे प्रदूषण उघड
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांंची तपासणी सुरू असली तरी चोरट्या पध्दतीने रासायनिक प्रदूषण सुरू असल्याचे दिसून आले आहे. अनेक कारखान्यातुन विषारी वायू सोडला जात असून काही ठिकाणी घातक रसायन सोडले जात असल्याने तारापूचे पर्यावरण दिवसेंदिवस धोकादायक होऊ लागले आहे. यातच येथील एका नेहमी प्रदूषणात अग्रेसर असलेल्या कारखान्यांने रसायन कारखान्यांच्या बाजूला असलेल्या सांडपाणी वाहिनीच्या चेंबर मध्ये सोडत असल्याने एक चित्रफितीत दिसून आले आहे. यामुळे अशा प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
तारापूर मधील कारखान्यांची तपासणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुरू असल्याने या तपासणी दरम्यान कारवाई होऊ नये यासाठी कारखानदार आपल्या कडील रासायनिक साठ्याची बेकायदेशीर पणे विल्हेवाट लावली जात आहे. रात्रीच्या वेळी देखील मोठ्या प्रमाणात विषारी वायू रासायनिक कारखानदार सोडत आहेत. अशाच रासायनिक प्रदूषणाबाबत एक चित्रफिती समोर आली असून काही दिवसापूर्वी औद्योगिक क्षेत्रातील साळवी केमिकल प्लाँट नंबर इ- 90 या रासायनिक कारखान्यात साठवून ठेवलेले घातक रसायन हे बेकायदेशीर पणे सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत सोडून दिल्याचे उघड झाले आहे. एकिकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषणकारी कारखान्यांची तपासणी करत असता देखील खुलेआम पणे कारखान्यातील घातक रसायन पाईपद्वारे चोरट्या पध्दतीने रासायनिक सांडपाणी वाहिनीत सोडले जात असल्याचे प्रकार घडत असल्याने कायद्याचा धाक प्रदूषणकारी कारखान्यांना उरला नसल्याचे दिसून येते.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणाचा स्थर दिवसेंदिवस वाढत चालला असून साळवी केमिकल या कारखान्यांवर याअगोदर देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली होती. मात्र नेहमीच प्रदूषणाची ओरड कारखान्या विरूद्ध केली जात असली तरी अशा प्रदूषणकारी कारखान्यांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. या कारखान्यांच्या बाजूला असलेल्या पावसाळी पर्जन्यजळ वाहुन नेणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात घातक रसायन वाहत असल्याचे अनेकदा दिसून आले होते. याठिकाणी असलेल्या सांडपाण्याची कोणत्याही प्रकारची केली जात नसुन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्थानिक पातळीवर असलेले अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. यामुळे अशा प्रदूषणकारी कारखान्यांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी मागणी जोरधरू लागली आहे.