■ २६ जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीदम्यान पोलिसांशी झालेल्या संघर्षात अनेक पोलीस जखमी.
पालघर दर्पण : प्रतिनिधी
कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून ६० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असून आता आंदोलनाने आक्रमक वळण घेतले आहे. काल २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. त्या रॅलीत शेतकरी व पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी नेत्यांन विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत २६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केले गेले नाही. असा आरोप केला आहे. यामुळे शेतकरी नेत्यांविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ९३ जणांना अटक केल्याचं बोललं जात आहे. तर २०० लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.