■ दिल्लीतील हा बॉम्बस्फोट दहशदवादी हल्ला असल्याची संशय.
पालघर दर्पण : विशेष प्रतिनिधी
दिल्लीच्या औरंगजेब रोडवर इस्त्रायल दूतावासाच्या जवळ शुक्रवारी रात्री बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केले आहे. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र मोठ्या तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. दिल्लीतील या स्फोटामागे इराणमधील दहशदवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दिल्लीत औरंगजेब रोडवर इस्त्रायल दूतावासाजवळ बॉम्बस्पोट झालेल्या ठिकाणी तपासा दरम्यान पोलिसांना एक चिट्ठी मिळाली आहे. या चिट्ठीत लिहलेला मजकुर वाचून या बॉम्बस्फोटामागे दहशदवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तपासा दरम्यान सापडलेल्या चिट्ठीत हा फक्त ट्रेलर आहे असे लिहुन इशारा देण्यात आला आहे. यामुळे इस्त्रायल दूतासाजवळ तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहे. तसेच या चिठ्ठीत इराण लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ मोहसीन फखरजादेह यांच्या नावांचा शहीद असा उल्लेख करण्यात असल्याने हा हल्ला इराणमधील दहशदवाद्यांनी केला असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
काल शुक्रवारी हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा दिल्लीत बिटिंग रिट्रीटचा सोहळा सुरु होता. त्यापासून २ किलो मीटर अंतरावर हा स्फोट झाला असल्याचे समोर आले आहे. परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कॅब दिसून आली आहे. या कॅबने दोन लोकांना घटनास्थळी सोडलं होतं. त्यानंतर कॅब निघून गेल्याचं दिसत आहे. कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला तिथे पायी जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. सीसीटीव्ही ही माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून दोन्ही व्यक्तींची स्केच तयार केली जात आहे.