■यवतमाळ मध्ये १२ लहानग्यांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझरचा डोस; लहानग्यांच्या प्रकृतीत बिघाड
पालघर दर्पण : प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यात १२ लहान मुलांना पोलिओ ऐवजी सॅनिटायझर चा डोस दिला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिओ ऐवजी सॅनिटायझरचा डोस दिल्याने त्या १२ लहान मुलांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याचे समजल्यावर रुग्णाला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिओ लसीकरण मोहिमे दरम्यान लहान मुलांना पोलिओ डोस ऐवजी चक्क सॅनिटायझरचा डोस दिला आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोपरी येथे हा प्रकार उघडकीस आला. सॅनिटायझरचा डोस दिल्याने लहान मुलांची प्रकृती बिघडली. १२ लहान मुलांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. त्यांना रविवारी रात्री यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
सुदैवाने या लहानग्यांच्या प्रकृती स्थिर असुन योग्य उपचारामुळे कोणाच्याही प्रकृतीत अधिक बिघाड झाला नाही. मुलांना डोस देत असताना लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजर होते. असे लहान मुलांच्या पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव चौकशी समितीने दिला आहे.