■अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजना.
पालघर दर्पण : प्रतिनिधी
पालघर : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर खरेदी करणेसाठी डीबीटी (डायरेक्ट बेनीफिट ट्रान्सफर) तत्वावर ९०टक्के अनुदान (कमाल रक्कम रु.३.१५ लाख मर्यदित) देण्याची योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविली जात आहे.
सदर योजनेचा लाभ घेणेकरीता पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांनी आपले प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर यांचे कार्यालयात सादर करावेत. या संबंधी अधिक माहितीकरीता आफरीन अपार्टमेंट, बी-विंग, पहिला मजला, रुम नं.१०७ येथिल कार्यालयाशी तसेच दुरध्वनी क्रमांक. ०२५२५-२५४२७७ वर संपर्क साधून जास्तीत जास्त बचत गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर यांचेकडून करण्यात आला आहे.