■ माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटर ला दिला झटका
पालघर दर्पण : प्रतिनिधी
मागे गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटर वरून चुकीची माहिती पसरवण्यात आली होती. त्याच बरोबर किसान नरसंहार सारखे हॅशटॅग देखील वापरण्यात आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने २५० ट्विटर अकाउंट्स ब्लॉक करण्याचा प्रस्ताव गेल्या गुरुवारी ट्विटरकडे दिला होता. मात्र ट्विटरने यावर कार्यवाही केलेली नसून तो प्रस्ताव फेटाळला आहे. त्यानंतर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट कू वर अकाउंट उघडलं आहे.
ट्विटर वरून शेतकरी आंदोलन या विषयावर अनेकजण ट्विट करीत आहेत. मात्र भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन बाबत चुकीची व प्रक्षोभक माहिती पसरविण्यात येत आहे. गृह मंत्रालयाच्या एका अहवालानुसार माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ही मागणी केली होती की, नव्या यादीत खलिस्तान्यांप्रती सहानुभूती दाखवणारे आणि पाकिस्तानशी संबंधित अकाउंट्सचाही समावेश आहे. तसेच काही स्वयंचलित चॅटबॉट आहेत ज्यांचा वापर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान चुकीची सूचना देण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे अशा अकाऊंटवर बंदी घालण्यात यावी अशी केंद्र सरकारने मागणी केली मात्र ती मागणी ट्विटरने फेटाली आहे. त्यामुळे केंद्रीय माहिती मंत्रालयाने स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट कू वर अकाऊंट उघडलं आहे. आयटी मंत्रालयाशिवाय अन्य सरकारी विभागांनीही कू वर खातं उघडलं आहे. माय गाव, डिजिटल इंडिया, इंडिया पोस्ट, नॅशनल इनफोर्मेटिक्स सेंटर (एनआईसी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इनफोर्मेशन टेक्नोलॉजी, कॉमन सर्व्हिस सेंटर, उमंग अॅप, डिजी लॉकर, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया यांनी देखील कू वर व्हेरीफिकेशन केले आहे.
कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. या आंदोलना जवळपास २ महिने १० दिवस झाले असून अनेक बैठकी देखील झाल्या मात्र तरी देखील अद्याप तोडगा निघाला नाही. त्यातच प्रजसत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचार नंतर शेतकऱ्यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले. पोलीस व शेतकरी यांच्यातील हिंसाचार नंतर आंदोलनाने आक्रमक वळण घेतले. यातच अनेक बॉलिवूड तसेच हॉलिवूड सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला तर काहींनी यावर विरोध दर्शवला. त्यावर पवारांनी देखील आपली शेतकऱ्यांच्या बाजूने आपली प्रतिक्रिया मांडली होती.