◾ रियाक्टर ची साफसफाई करताना आगीचा भडका उडून एक कामगार गंभीर तर एक किरकोळ जखमी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थकेअर कारखान्यात शनिवारी दुपारच्या वेळेस आगीच भडका उडून दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. रियाक्टर ची साफसफाई करताना खबरदारी घेतली नसल्याने हा अपघात घडला असल्याचे समोर आले आहे. भाजून गंभीर जखमी झालेल्या एक कामगारांची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणासाठी अग्रेसर असलेल्या बजाज हेल्थकेअर उद्योजकांच्या प्लाँट नंबर- एन 216, 281,128 या कारखान्यात शनिवारी दुपारच्या वेळेस भिषण अपघात घडला. कारखान्यात असलेल्या रियाक्टरची पाणी टाकून साफसफाई करत असताना. सँटींक करंट निर्माण झाल्याने खालच्या बाजूने एकच मोठा आगीचा भडका उडाला यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेला कामगार निलेश बोरसे, वय २८ हा गंभीर पणे भाजून जखमी झाला असून महेंद धांडे, वय ४५ हा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना बोईसर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र यामधील निलेश बोरसे या कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. तसेच बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी यांनी देखील कारखान्यात भेट देवून पाहणी केली आहे.
◾ बजाज हेल्थकेअर कारखान्याच्या याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी देखील ४ मे २०१९ रोजी फॉस्परस ऑक्सीक्लोराईड या रसायनामुळे 45 कामगारांना डोळ्याला दुखापत झाली होती. काही कामगारांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत देखील झाली होती. परंतु कारखाना सुरक्षा विभागाने कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई त्यावेळी देखील केली नाही. यामुळे अशा बेजबाबदार उद्योजकांवर व त्यांच्या व्यवस्थापकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.