◾वेवजी सिगलपाडयाला भुकंपाबरोबर भुसुरुंगाचे धक्के; जिवाला धोका
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: तलासरी तालुक्यातील वेवजी येथे खदाण व्यसायिकांकडून स्वामित्वधनाच्या नावाखाली परिसरातील अन्य क्षेत्रातही बेकायदा दगड उत्खननाचा सपाटा लावल्याने दररोजच्या भुकंपाच्या धक्क्यांनंतर खदाणीच्या सुरुंगस्फोटाच्या धक्याने त्रस्त वेवजी सिगलपाडा रहिवाशांनी दगडखदाणी बंद करण्याची मागणी तहसीलदारांना केली आहे. मात्र महसुल विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
वेवजी येथे एकूण दोन दगड खाणींना राॅयल्टी दिल्याचे महसूल अधिकार्यांचे म्हणने असले तरी त्यापेक्षा जास्त दगडखाणीतून दगड काढून त्याची वाहतुक केली जात आहे. वेवजी काटीलपाडा येथे सर्वे नं. २२४/४,९,१० ही जागा विजय पटेल यांच्या नावे असताना या भुखंडाची क्रिष्णा स्टोन सप्लायर्सच्या नावे मोजणी नकाशा बनवण्यात आला आहे. मोजणी नकाशाच्या आधारावर क्रीष्णा स्टोन क्रशरला खदाणीचे गाैणखनिज स्वामित्वधन परवाना देण्यात आल्याने स्थानिकांनी या परवान्यावर आक्षेप घेतला आहे. सातबार्यावर नाव नसताना, बीनशेती परवाना तसेच स्थळपंचनामा न करताच वेवजी येथे गाैणखनिज परवाना देण्यात आल्याने या परवानगीची तसवच मोजणी नकाशाची तपासणी करण्याची रहिवाशांची मागणी आहे. दररोजच्या ८ ते १० वेळा भुसुरुंगस्फोटामुळे अनेक रहिवाशांच्या घरांना तडे गेले आहेत. बोअरिंग, विहीरींच्या पाण्याची पातळी खाली गेली आहे. स्फोटात उडालेले दगड घरावर पडत असल्याने दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. भुकंपामुळे अधिच घरांना तडे गेले आहेत. त्यात दररोज भुसुंगाचे धक्के बसल्याने घरांबरोबर जीवाला धोका असल्याचे रहिवाशांचे म्हणने आहे.
डहाणू तालुका भुसुरुंग भंगूर प्रदेश जाहीर केल्याने. पर्यावरण दृष्टीने समतोल राखला जावा यासाठी डहाणूच्या २५ कि.मी परिसरात महसूल विभागाने माती उत्खनन, खदाणी या संदर्भात नियम करुन दिले आहेत. त्यामुळे दगड खदाण मालकांनी डहाणू लगतच्या तलासरी तालुक्यातील डोंगरटेकड्यांना लक्ष्य केले जात आहे. सातबारा उतार्यानुसार गाैणखनिजाच्या उत्खननासाठी परवानगी दिल्यानंतर जवळपासच्या परवानगी नसलेल्या जमिनीवरही उत्खनन केले जात आहे. महसूल विभागाच्या अधिकार्यांकडून उत्खननासाठी परवानगी देण्यापुर्वी जागेची पाहणी किंवा पंचनाम्याची कारवाई केली जात नाही. या सर्व प्रकारामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. मागे एका खदाण मालकास तलासरी तहसीलदारांनी पाच कोटीचा दंड बजावला होता. मात्र हा दंड न भरताच त्यांनाच पुन्हा परवाना देण्यात आल्याने स्थानिकांचा खदाणीला विरोध आहे.
◾वेवजी येथे दोन खदाणींना प्रत्येकी ५०० ब्रास राॅयल्टी देण्यात आली आहे. फक्त ५०० ब्रास पर्यंत राॅयल्टीचे अधिकार आम्हाला आहेत.
— स्वाती घोंगडे, तहसीलदार तलासरी
◾वेवजी येथे खदाण मालक ज्या जागेच्या सातबार्यावर राॅयल्टी काढली आहे. त्या जागेवर उत्खनन न करता दुसर्या जागेत उत्खनन करतात.आम्ही तलासरी तहसीलदारांना ग्रामस्थांच्यानावे तक्रार अर्ज दिले आहे.
—भरत देवू उराडे ग्रामस्थ वेवजी सिगलपाडा