■ पेपर लीक झाल्याने संबंधित विभागाने केली कारवाई; माजी लष्करी सैनिका सोबत अजून २ नागरिकांना अटक
पालघर दर्पण, प्रतिनिधी
सैन्य भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाली असल्याने गुप्तचर विभागाच्या माहिती आधारे पुणे मुख्यालयातील दक्षिणी कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स युनिट आणि पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाने संयुक्त कारवाई केली. परीक्षेत येणारी प्रश्नपत्रिका लीक झाली असल्याचे समजल्यावर रविवारी देशभरात विविध ठिकाणी होणारी परीक्षा रद्द झाली आहे.
या कारवाईत विविध ठिकाणी छापा टाकण्यात आला त्यादरम्यान पुणे पोलिसांनी आतापर्यंत लष्कराच्या माजी सैनिकाला आणि दोन नागरिकांना अटक केली आहे. पेपर लीक कसे झाले व संशयित ते कसे इतरांना वाटत होते याचा शोध घेण्यात येत आहे. संशयितांनी प्रत्येक उमेदवाराकडून परीक्षेच्या पेपरसाठी ४ ते ५ लाख रुपये घेतले असल्याची माहिती चौकशीत उघडकीस आली आहे.