◾वळवांडा येथे ८० टक्के शेतकरी स्वावलंबी;जलव्यवस्थापनातून रोजगाराच्या वाटा
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील वाळ वंडा गावातील शेतकऱ्यांनी रोजगारासाठी वणवण आणि स्थलांतर थांबवण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेत मोगरा फुलशेतीवर भर दिला आहे. मोगरा, कागडा या फुलांच्या लागवडीतून त्यांना वर्षभर टप्प्याटप्प्याने उत्पनाच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक मिळकत वाढविली आहे.
विक्रमगड तालुक्यातील
वाळवंडा, साखरा, पोचाडा, अंधेरी, आदी गावातील आदिवासी कुटुंबांना रोख पैसा मिळत असून स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे. वाळवंडा गावात तब्बल ६० कुटुंब घरोघरी मोगरा उत्पादन घेतले गेले आहे. त्यासाठी सावली फाऊंडेशन आणि ग्रामपंचायतीने पाईप तसेच साहित्य पुळूर्वठा केला आहे. पांढरा दिवसाने पांढरा हजार रुपये मिळतात.त्यामुळे डोंगराळ भागातील शेतकऱ्यांचा मोगरा लागवडीकडे कल वाढला आहे.
डहाणू, पालघर, वसई, तालुक्यातील तालुक्यांतील सिंचनाचे प्रमाण अधिक असलेल्या भागातच मोगराची लागवड व्हायची. पाण्याचे सोय जिल्ह्य़ातील शेतकरी रब्बी पीक म्हणून मोगरा लागवडीकडे वळला आहे. वाळवांडा गावातील शेतकरी दादर येथील फूल बाजार फूल व्यापाऱ्यांना मागणीनुसार थेट फुलांच्या गड्या पार्सल पाठवितात. सावली फाउंडेशनने शेतकऱ्यांना मोगरा वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध करून दिले आहे. या जीपने दररोज मोगरा कळ्यांचे पार्सल संबंधित ठिकाणी पाठविले जाते. पंधरवड्यात त्यांना हिशोब करून रोख पैसे दिले जातात. या व्यापाऱ्यांकडून प्रतिकिलो सिजनला पहिल्या दर्ज्याच्या मालाला पंधराशे ते दोन हजार किलो भाव मिळतो. सध्या बाजारात सहाशे ते आठशे रुपये भाव मिळत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
जल व्यवस्थापन आणि फुलशेतीचा विस्तार पारंपरिक पिकांच्या तुलनेत मोगरा ही फुलपिके फायदेशीर ठरली आहेत. वाळवंडा येथील स्थानिक शेतकरी, ग्रामपंचायत, सावली फाउंडेशनने श्रमदानातून नाल्यावर दोन बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवले आहे. या बंधर्यामुळे अडवलेल्या पाण्याचे वाळवांडा ग्रामस्थांनी पाणी व्यवस्थापन केले आहे. कुपनलिका, पाईप आणि पाण्याच्या टाक्या उभारून डोंगराळ माळरानावर मोगरा लागवड केली आहे. या बांधर्यामुळे पाणी अडवून विहिरीच्या पाण्याची पातळी उन्हाळ्यात टिकून राहते. गाई गुरणा पाणी मिळते. पाणी व्यवस्थपनामुळे कूपनलिकेच्या माध्यमातून सिंचनाची सोय झाल्यामुळे उत्पन्नाची खात्री वाढली. फुलशेतीतून खर्च जाता वर्षाकाठी लाखांचे उत्पन्न मिळते. उत्पन्नाच्या खात्रीमुळे विक्रमगड तालुक्यातील स्थलांतर थांबून फुलशेतीचा विस्तार झाला आहे. यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने मदत दिली आहे. मात्र कृषी खात्याने पुढाकार घेतल्यास अनेक ओसाड माळरानावर मोगरा बहरून स्वयंरोजगार मिळू शकेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सुरवातीला वाळवंडा येथील संतोष लक्ष्मण बरफ यां शेतकऱ्याने मोगरा लागवड केली. त्याच्याकडून मोगऱ्याच्या कांड्या आणून इतर शेतकऱ्यांनी शेतात लावल्या.त्यांना ३ ते ४ वर्षांनी कळ्या येऊ लागली. व उत्पंनाचा मार्ग मिळाला. एक दुसऱ्याचे अनुकरण करून संपूर्ण गावाने मोगरा लागवडीतून रोजगार मिळवला आहे. जल व्यवस्थापन करून वालवडा ग्रामपंचायतीचा खंडीचापाडा, फणस पाडा,उंबरवांगण, वळवांडा जुना गाव ,नवा गाव या सर्व पाड्यात सर्व शेतकरी मोगरा लावत आहेत. तर लहान मुले गजरा बनवून १० रुपये प्रमाणे गजरा विकुन रोख पैसे कमवतात.
◾ वाळ वांडा गावात ६० कुटुंब मोगरा लागवड करत आहेत. सुरवातीला आम्हाला उन्हाळ्यात रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत असे. मात्र आता शेतीतच रोजगार मिले लागल्याने स्थलांतर थांबले आहे. माझ्या घराजवळ मोगऱ्याची ३०० रोपे आणि शेतीवर ३०० रोपे लावली आहेत. पांधरा दिवसात ३५ ते ४० किलो मोगरा निघतो. १५ हजार रुपये मिळतात.
— काशिनाथ रामजी पडवळे वाळवांडा