■ कारवाईच्या बातमीवर सोशल मीडियावर चर्चा; जेष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी साधला मोदी सरकारवर निशाणा.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
जेष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विटर वरून ट्विट करून मोदी सरकारला टोला लगावला आहे. आज आयकर विभागाने दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर छापे टाकण्यात आले या कारवाईचे सोशल मीडियावर चर्चा सुरू असून अनेकांनी यावर शंका व्यक्त केल्या. यावर जेष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी देखील आपले मत ट्विटर वर ट्विट करून मांडले आहे.

आयकर विभागाने अनुराग कश्यप व तापसी पन्नू या दोघांच्याही मुंबईमधील मालमत्तावर छापे टाकत तपास सुरु केला आहे. या दोघांव्यतिरिक्त एकूण २० जणांच्याविरोधात आयकर विभागाने छापे टाकत तपास सुरु केला आहे. यामध्ये विकास बहल आणि मधु मंटेनासारख्या व्यक्तींचाही समावेश आहे. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तांचा समावेश आहे.
यावर प्रशांत भूषण यांनी तर अशाप्रकारे केंद्रीय यंत्रणांचा वापर यापूर्वीही कधीही करण्यात आला नव्हता असा टोला मोदी सरकारला लगावला आहे. भूषण यांनी अनुराग आणि तापसीविरोधात आयकर विभागाने केलेल्या कारवाईची बातमी शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाची ए टीम कामाला लागली आहे. आपल्या इच्छेप्रमाणे न वागणाऱ्यांना त्रास द्या, धमकवा आणि गप्प करा. भारताने अशाप्रकारे सूडबुद्धीने आयकर विभाग, सक्तवसुली संचलनालय, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेचा वापर यापूर्वी कधीही पाहिला नाही असे ट्विट यांनी केलं आहे.