■ १३ तासांच्या चौकशी नंतर एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे याना अटक.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई :उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले चारचाकी वाहन सापडले. त्या नंतर मुंब्र्यात वाहनांच्या मालकाचा मृतदेह आढळल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होतीे. आता या याप्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे याना काल रात्री उशिरा एनआयए कडून अटक करण्यात आली आहे.
रात्री ११:३० नंतर वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल १३ तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी ११ वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास १३ तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली.
आज वाझे यांना न्यायालया समोर हजर करण्यात आले. एनआयएने वाझे याना कोठडी देण्याची केली. ही मागणी न्यायालयाने मंजूर केली असुन १० दिवसांची म्हणजेच २५ मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे.