■जव्हार मधील ४२ विधर्थ्यांना व ६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण तर नंडोरे येथील आश्रमशाळेतील ९ विद्यार्थिनींना कोरोनाची लागण.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
मध्यंतरी करोनाचे संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता नियमांचे पालन न केल्याने करोना ही महामारी पुन्हा डोके वर काढू लागली आहे. राज्यात पुन्हा करोना रुग्ण बळावत असल्याची माहिती समोर येत असुन पालघर जिल्ह्यातही करोनाच्या रुग्ण बळावत आहेत. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील करोना रुग्णांची संख्या २०५ येऊन पोचली आहे. पालघर जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गाला व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात हिरपाडा येथे ४२ विद्यार्थी व ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्या नंतर नंडोरे येथे ९ विद्यार्थिनींना करोना लागण झाल्याची देखील माहिती समोर आली. हिरपाडा येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असल्याचे समजताच शाळेतील विद्यार्थ्यांचे आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. तसेच नंडोरे आश्रमशाळेतील ९ विद्यार्थिनींना करोनाची लागण झाल्याचे समजताच त्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनसह कर्मचाऱ्यांची देखील तपासणी करण्यात आली.
*पालघर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या*
पालघर जिल्ह्यात जव्हार या ग्रामीण भागात सगळ्यात जास्त करोनाचे रुग्ण आढळले असुन जवळपास ८५ रुग्ण आहेत. तर मोखाडा व तलासरी भागात करोना रुग्णांची संख्या शुन्य आहे. तसेच वसई भागात देखील करोना रुग्ण संख्या शुन्य या आहे. पालघर तालुक्यात ७५, वाडा या भागात ३२ व डहाणूमध्ये १२ व विक्रमगडमध्ये १ अशी करोना रुग्ण संख्या आहे.