■करोना रुग्ण बळावल्याने ठाकरे सरकारचा ताण वाढतोय; गुरुवारी २४ तासात २५ हजार ८३३ इतके रुग्ण तर ५८ जणांनाचा मृत्यू
पालघर दर्पण, प्रतिनिधी
मध्यंतरी करोनाचे संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता नियमांचे पालन न केल्याने पुन्हा करोना महामारी पुन्हा डोके वर काढू लागली आहे. राज्यात पुन्हा करोना रुग्ण बळावत असल्याचे दिसून येत आहे. यावर आता लॉकडाऊन होणार की काय अशी चर्चा नागरीकांमध्ये होत आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार येथे माध्यमनशी बोलताना खुलासा केला आहे.
दिवसेंदिवस करोना रुग्ण बळावल्याने आता ठाकरे सरकारचा ताण वाढत आहे. गुरुवारी एका दिवसात सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली.२४ तासात २५ हजार ८३३ इतके करोना रुग्ण सापडले असुन ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे लॉकडाऊन होणार का या चिंतेत नागरिक आहेत. यामुळे नंदुरबार येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा लॉकडाऊन होणार का यावर माध्यमांशी बोलले.
करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. सप्टेंबरमध्ये करोना रुग्णांनाचा जो सगळ्यात मोठा अंक गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पुढे आहोत. पुन्हा लॉकडाऊन करणं एक मार्ग आहे. लॉकडाऊनचा पर्याय समोर दिसत आहे. मात्र मला अजूनही नागरिकांन कडून सहकार्याची अपेक्षा आहे. नागरीक आता मास्क वापरु लागले आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. त्याच बरोबर पुढे ते म्हणाले की, परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे. त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते. मात्र आता जो पसरतो तो नवा विषाणू आहे का याबाबत माहिती अद्याप तरी दिलेली नाही.