पालघर दर्पण, प्रतिनिधी
सध्या करोनाचे रुग्ण बळावत असुन आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील करोना झाला आहे असे त्यांनी स्वतः आपल्या सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी फेसबुक, ट्विटर अशा अनेक सोशल मीडियावर माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. असे सांगितले
करोना या महामारीने संपूर्ण जग व्यापल असुन देशावर आलेले करोनाच सावट केव्हा जाईल याची नागरिक प्रतीक्षा आहे. मात्र त्यात आता करोना रुग्ण अधिक बळावत असल्याचे गेल्या दोन दिवसांपासून दिसुन आल्याने नागरिक आता चिंतेत आहेत.