■ गृहमंत्र्यांनी दिल होत सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्यात टार्गेट; परमबीर सिंह यांचा आरोप
पालघर दर्पण, प्रतिनिधी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर असलेल्या गाडीत स्फोटके आढळून आली. त्यामध्ये सचिन वाझे याना अटक झाली. या प्रकरणात आता अनेक खुलासे होत आहेत. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांचे देखील या प्रकरणात नाव समोर येत आहे. त्यामुळे विरोधक आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
मागील काही दिवसांमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर आपले मत व्यक करताना माध्यमांना सांगितले होते की, परमबीर सिंह यांची बदली रुटीन नव्हती. तसेच पोलीस दलातील अधिकाऱ्यां कडून काही माफ न करण्या सारख्या चुका झाल्या असे सांगितले. त्याचमुळे परमबीर सिंह यांनी पत्र लिहलं असुन या पत्रात गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत.
परमबीर सिंह यांनी पत्रात सांगितले की, सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकद एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास १ हजार ७५० बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून २-३ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी ४०-५० कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल.” तसेच सचिन वाझेंनी त्याच दिवशी माझ्या कार्यालयात येऊन या सगळ्या प्रकाराबद्दल मला माहिती दिली. ते ऐकून मला धक्काच बला. या प्रकारावर काय करावं, यावर मी विचार करायला लागलो. असं परमबीर सिंग यांनी पुढे म्हटलं आहे.