■स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे; ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले अनिल देशमुखांनी आपले मत.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर असलेल्या गाडीत स्फोटके आढळून आली. त्यामध्ये सचिन वाझे याना अटक झाली. या प्रकरणात आता अनेक खुलासे होत आहेत. परमबीर सिंह यांनी पत्र लिहिले असुन गृहमंत्र्यांनी वाझे यांना १०० कोटी वसुली करण्यासाठी सांगितले होते. असा आरोप केला. त्यामुळे विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करत आहेत. मात्र आता त्यानु ट्विट करू हे आरोप फेटाळे आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये लिहिले की, मुकेश अंबानी प्रकण तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणार सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पर्यत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातुन होत असताना परमबीर सिंह यांनी स्वतःला वाचण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. असे गृहमंत्र्यांनी ट्विट केले.
मात्र देशमुख यांच्या ट्विट वरून अजून एक गोष्ट समोर येत आहे. ती म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये मनसुख हिरेन हत्याप्रकरणी असा उल्लेख केला आहे. या ट्विट विषयी आता चांगल्याच चर्चा रंगु लागल्या आहेत. या आधी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांनी हिरेन यांची हत्या केली आहे असा संशय व्यक्त केला होता. मात्र आता स्वतः गृहमंत्र्यांनी असे ट्विट केले असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.