■ शुक्रवार रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत राज्यात लॉकडाऊन; बैठकीत एकमताने निर्णय
पालघर दर्पण: प्रतिनिधी
मुंबई: मध्यंतरी करोनाचे रुग्ण बऱ्यापैकी कमी आढळून येत होते त्यामुळे करोना या महामारी पासून लवकरच सुटका होईल अशी नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली होती. मात्र यातच आता पुन्हा एकदा ही महामारी डोके वर काढत असुन करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल. तसेच विविध तज्ञ राजकीय नेते व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सांगितले होते. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली असुन राज्यात उद्या पासून कठोर निर्बंध लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ एप्रिल (उद्या) रात्री ८ वाजेपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल. व इतर वेळेस जमावबंदीचे आदेश लागु असतील. त्याच बरोबर शुक्रवारी रात्री ८ वाजता ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संपूर्ण लॉकडाऊन असेल असा देखील बैठीक निर्णय घेण्यात आला.
■ काय काय सुरू असणार.
होम डिलिव्हरी व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५०% क्षमतेने सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेने सुरू राहतील. कामगारांवर बंधन नसतील. कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकाम सुरू राहतील. बाजारपेठ सुरू राहतील मात्र गर्दी कमी असणे आवश्यक आहे. लोकल ट्रेन सुरू असतील. लग्नसमारंभात लोकांची संख्या मर्यादित. टॅक्सी, बस, रिक्षा सुरू असतील. मात्र सोशल डिस्टनसिंग व मास्क चा वापर करून या सुविधांचा लाभ घेता येईल. विमान प्रवासा बाबत कोणतेही बदल नाहीत मात्र टेस्टिंग कडक करणार. २० लोकांना अंत्यविधीसाठी परवानगी.
■ काय काय बंद असणार.
धार्मिक स्थळे बंद असतील. मात्र पुजाऱ्यांना पूजा करण्याची मुभा देण्यात आली आहे. सिनेमागृह नाट्यगृह संपूर्णतः बंद, राज्यातील गार्डन, मैदाने बंद व चौपाट्या बंद राहतील.