सूर्या नदीच्या अर्धशुष्क पात्रात, करंज झाडाखाली दगडांवर रंगरंगोटी
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: डहाणू तालुक्यातील खाणीव गावातील सूर्या नदीच्या अर्धशुष्क पत्रात दगडांवर भू कला साकारली आहे. खानिव येथील गर्द झाडीतून जाणाऱ्या ओहळात काळ्या दगडांवर शुद्ध चुन्याचे पट्टे मारून ह्या आकर्षक आकार दिल्याने ही भूरचना जंगल सफरी ना आकर्षित करीत आहे. रानातून जाणाऱ्या आदिवासी बांधवांनी क्षणभर थांबून त्या कलेला दाद सुद्धा दिली.
पालघर जिल्ह्यातील वास्तुविशारद प्रतीक धानमेर आणि मुंबई मधील वास्तुविशारद विस्मयी कारंडे ह्यांनी केला. महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या 14 कलाकारांबरोबर अवघ्या दोन दिवसात भू कलेचा आविष्कार साकारला आहे. या रंगकाम साठी जांभूळ या झाडाची फांदी आणि शुध्द चुना वापरण्यात आल्याची माहिती प्रतिक धान मेहेर यांनी दिली आहे. शुद्ध चुनाचा वापर केल्याने नदीतील पाण्याला आणि भूभागाला हानी पोहोचणार नाही असा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दगडांच्या पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबाने त्या संपूर्ण कलेला वेगळीच खोली आली.
◾भू-कला ( land art ) ही साधारण 1970 च्या दशकात नावारूपास आलेली कला. अँडी गोल्डस्वर्दी ह्या महान कलाकाराने ह्या कलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवून दिले. कोणतेही साधन न वापरता, जंगलात मिळेल त्या साहित्याने कला आकारणे म्हणजे भू कला. जगातील बहुतांश आदिवासी समाज अश्याच कलांमधून व्यक्त होत आला आहे. ही कला निसर्गाला कोणतीही हानी पोहोचवत नाही. उलट कलाकाराचे निसर्गाशी असेलेले नाते दृढ करते.
◾कित्येकदा जंगलात, हिमालयात किंवा नदी किनारी फिरायला गेल्यावर त्या भागाचे फोटो काढणे इतकेच काही ते आपले त्या भागाशी नाते. पण काही वेळ तिथे व्यतीत करून तेथील निसर्गाला समजून ही कला रूप घेते. भलेही ही कला तात्पुरती असली तरी सामान्यांच्या मनात तिचे खोल अस्तित्व निर्माण होते.
–प्रतिक धानमेहेर, कलावंत