◾राज्यात उद्यापासून संचारबंदी; मुख्यमंत्री यांची घोषणा
पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई : राज्यात १४ एप्रिल (उद्या) पासुन संचाबंदी लागू होणार आहे. बुधवारी दिनांक १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांसाठी संचारबंदी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याच बरोबर अत्यावश्यक सेवेखाली काय सुरू राहणार तसेच कोणकोणत्या बाबतीत सूट असणार व काय बंद राहील याची देखील माहिती मुख्यमंत्री यांनी सांगितली.
राज्यात फेब्रुवारी २०२१ पर्यंत परिस्थिती ठीक झाली होती परंतू कोरोनाचा नवा विषाणु असा आहे जो वेगाने पसरतो. त्याला थांबवायचे असेल तर काही कडक निर्बंध आवश्यकच असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. लॉकडाऊन करायचं की कडक निर्बंध या संबंधी सर्वपक्षीय नेते, डॉक्टर, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधी, तज्ज्ञांशी चर्चा देखील केली. या सर्व चर्चांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातल्या जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. व विनाकारण घराबाहेर पडू नये असे आव्हाहन नागरिकांना केले.
■ मुख्यमंत्री यांची मदतीची घोषणा
नोंदणीकृत घरगुती कामगारांना निधी देण्यात येईल.
परवानाधारक रिक्षा चालकांना १५०० रुपये देण्यात येतील.
नोंदणीकृत फेरीवाल्यांना देखील १५०० रुपये देण्यात येतील.
शिवभोजन थाळी मोफत दिली जाईल.
गरजूंना १ महिन्यासाठी ३ किलो धान्य मोफत दिले जाईल.
■ अत्यावश्यक सेवेखाली काय सुरू राहणार
१) सर्व वैद्यकीय सेवा सुरू राहतील.
२) सार्वजनिक वाहतूक सुरू राहील.
३) दूध, डेअरी ची दुकाने सुरू राहतील.
४) किराणा, बेकरी व फळ विक्री सुरू राहील.
५) प्राण्यांसंदर्भातील सेवा सुरू राहतील.
६) खत दुकाने शीतगृहे व शेतीची कामे सुरू राहतील
७) सर्व बँक सुरू राहतील.
८) माल वाहतूक सेवा सुरू राहतील.
९)टेलिकॉम कंपन्या सुरू राहतील.
१०) पेट्रोलपंप सुरू राहील.
११) एटीएम सुरू राहील.
१२) इलेकंट्रोनिक व गॅस सप्लाय सुरू राहील.
१३) सर्व प्रकारच्या सुरक्षा एजन्सी.
१४) बंदरे व वाहतूक सुरू राहील.
१५) अत्यावश्यक ऑनलाईन खरेदी करू शकतात. व टपाल कार्यालय सुरू राहील.
१६) दूतावास, सर्व कर्मचारी कार्यालये सुरू राहतील.
१७) लसीकरण सुरू राहील.
१८) पाणीपुरवठा,शेअर बाजार, सफाई कर्मचारी व अत्यावश्यक उद्योगधंदे सुरू राहतील.
■ काय बंद असणार.
१)हॉटेल रेस्टोरंट व बार बंद (मात्र केवळ पार्सल सेवा सुरू राहील.
२)अनावश्यक कामा शिवाय बाहेर फिरता येणार नाही.
३)सलून ब्युटीपार्लर बंद स्पा सेंटर बंद राहतील.
४)राज्यातील शाळा महाविद्यालये बंद राहतील.
५)खासगी क्लासेस पूर्णपणे बंद राहतील
६)राज्यातील धार्मिक स्थळे बंद राहतील.
७)राज्यातील चित्रपट गृह बंद
८)धार्मिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रम बंद राहतील.