■ सीबीएसई दहावी बोर्डाची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
करोना ही महामारी दिवसेंदिवस वाढत असुन त्याचे रुग्ण बळावत आहेत. त्यामुळे राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली असुन आता सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
करोनाचे रुग्ण फेब्रुवारीत कमी होत असताना दिसत होते त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी करोना या महामारी पासुन सुटका होईल अशी नागरिकांमध्ये अपेक्षा निर्माण झाली होती. अचानक परिस्थिती उलट झाली असुन करोनाची दुसरी लाट आली. ही लाट पहिल्या पेक्षाही भांयकर असे म्हंटले जात आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील पंधरा दिवसां पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यामध्ये परीक्षा पुढे ढकलण्यात येतील असे मुख्यमंत्री यांनी काल माध्यमांशी झालेल्या संवादात सांगितले होते. २ दिवसांपूर्वी देखील शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येतील असे सांगितले होते.
यातच आज केंद्र सरकारचे सीबीएसई च्या इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केला असुन बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता एक जून रोजी सीबीएसई कडून करोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. एमपीएससी सारखी दहावी बारावीच्या परीक्षा सुद्धा पुढे ढकलाव्यात अशी मागणी होती. आधारावर प्रशासकीय अधिकारी, पालक वर्ग आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे.